बांधकाम कामगार योजना 2025: बांधकाम कामगारांना सरकार देणार 5000 रुपयेबांधकाम कामगार योजना 2025: बांधकाम कामगारांना सरकार देणार 5000 रुपये
बांधकाम कामगार योजना 2025: महाराष्ट्रातील बरेच बांधकाम मजूर हे दररोज कष्ट करून आपल्या कुटुंबाचा पालनपोषण करत असतात. मात्र, त्यांचे उत्पन्न अनियमित असल्या कारणाने त्यांना बऱ्याच वेळा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा गरजू बांधकाम कामगारांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने “बांधकाम कामगार योजना” सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना दरवर्षी सरकाकडून आर्थिक मदत दिली जाते, ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात काही प्रमाणात आर्थिक मदत होते आणि त्यांच्या कुटुंबाची देखील योग्य काळजी घेतली जाईल.
बांधकाम कामगार योजना म्हणजे काय?
बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी सुरू केलेली एक योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत मजुरांना 2000 ते 5000 रुपयांपर्यंत वार्षिक आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम त्यांच्या रोजच्या जीवनातल्या वस्तू, वैद्यकीय गरजा, शिक्षण किंवा इतर दैनंदिन गरजांमध्ये वापरता येते.
ही मदत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या माध्यमातून दिली जाते. सध्या राज्यात सुमारे 12 लाख बांधकाम कामगार नोंदणीकृत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
योजनेचे नाव | बंधकम कामगार योजना |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
देखरेख करणारा विभाग | राज्य सरकार कल्याण मंत्रालय |
लाभार्थी | महाराष्ट्रातील बांधकाम कामगार |
उद्देश | बांधकाम कामगारांना आर्थिक मदत करणे |
किती रुपये दिले जातात | 2000 ते 5,000 दरवर्षी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
वेबसाइट | https://mahabocw.in/ |
बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब व कष्टकरी मजुरांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे.
त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे.
त्यांच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजांसाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे.
समाजात त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आधार देणे.
योजनेच्या लाभासाठी पात्रता काय असावी?
- जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर खालील अटीं पूर्ण करणं आवश्यक आहे:
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
- अर्जदाराने कमीत कमी 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
- अर्जदाराचे नाव महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
योजनेत अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते-
- आधारकार्ड
- राहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- 90 दिवसांचे काम केले असल्याचा प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
- मोबाईल क्रमांक
- रेशनकार्ड
ऑनलाईन अर्ज कसा कराल?
1. सगळ्यात अगोदर https://mahabocw.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
2. “Workers” सेक्शनमध्ये जाऊन “Worker Registration” या पर्यायावर क्लिक करा.
3. आता “Check your eligibility and proceed to register” हा फॉर्म भरा.
4. तुमची पात्रता तपासल्यानंतर “Proceed to Form” या पर्यायावर क्लिक करा.
5. अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6. सर्व माहिती पडताळून घेतल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
7. तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल.
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
1. अधिकृत वेबसाईट https://mahabocw.in वर जा.
2. “Construction Workers Registration” हा पर्याय निवडा.
3. अर्ज फॉर्म PDF स्वरूपात डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
4. फॉर्ममध्ये सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जमा करा.
5. हा फॉर्म जवळच्या इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जमा करा.
FAQ’s
Q: बांधकाम कामगार योजनेत किती आर्थिक मदत मिळते?
Ans: पात्र लाभार्थ्यांना 2000 ते 5000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.
Q: अर्ज कोणत्या वेबसाईटवरून करता येतो?
Ans: या योजनेसाठी https://mahabocw.in या वेबसाईटवरून अर्ज करता येतो.
Q: अर्ज ऑफलाईन कसा करायचा?
Ans: वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करून जवळच्या कामगार कल्याण मंडळ कार्यालयात जमा करावा लागतो.
निष्कर्ष
बांधकाम कामगार योजना 2025 ही महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात काम करत असणाऱ्या कामगारांसाठी एक मोठा दिलासा देणारी योजना आहे. या योजनेद्वारे राज्य सरकार त्यांच्या जीवनात थोडे आर्थिक स्थैर्य आणण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर याचा लाभ जरूर घ्या आणि इतर गरजू कामगारापर्यंत ही माहिती नक्की पोहचवा.
तुमच्याकडे अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा, आम्ही लवकरात लवकर उत्तर देऊ.