बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र 2025 – गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार 51,000 रुपये

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र 2025 – गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार 51,000 रुपये

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र: आपल्या राज्यात अनेक हुशार मुलं आहेत, पण काहीजण केवळ पैशाच्या अभावामुळे शिक्षण अर्धवट सोडतात. विशेषतः जे मुलं दूरच्या गावांमधून तालुका किंवा जिल्हा ठिकाणी शिक्षणासाठी येतात, त्यांना राहण्यापासून जेवणापर्यंत अनेक अडचणींना सामोर जाव लागते. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारन “बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” सुरू केली आहे. ही योजना खास करून अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध (NB) समाजातील विद्यार्थ्यांसाठी आहे.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी 51,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम त्यांना राहणं, जेवणं, शिक्षण शुल्क यासाठी वापरता येते. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलंही निर्धास्तपणे शिक्षण घेऊ शकतात.

स्वाधार योजना 2025 ची महत्वाची माहिती:

  • योजनेचं नाव: बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
  • संचालन करणारा विभाग: समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन
  • लाभार्थी: अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी
  • वर्ष: शैक्षणिक वर्ष 2024-25
  • अधिकृत वेबसाइट: sjsa.maharashtra.gov.in
  • अर्जाचा प्रकार: ऑफलाइन
  • शिष्यवृत्ती रक्कम: 51,000 रुपये पर्यंत

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
  • केवळ अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • विद्यार्थी किमान 10वी, 12वी, डिप्लोमा, डिग्री किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात नियमित शिकत असावा.
  • मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण आवश्यक (अपंग विद्यार्थ्यांसाठी 40% चालतात).
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.5 लाखांपेक्षा कमी असावी.
  • सरकारी वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा.
  • आधारकार्ड लिंक असलेलं बँक खातं आवश्यक.

स्वाधार योजनेचे फायदे:

51,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती, जी खालीलप्रमाणे विभागलेली असते:

राहण्याचा खर्च: ₹28000
जेवण खर्च: ₹15000
इतर खर्च: ₹8000
इंजिनिअरिंग/मेडिकल: ₹5000 अधिक
इतर शाखा: ₹2000 अधिक

ही रक्कम विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यात मोठी मदत करते.

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र 2025 – गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार 51,000 रुपये

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

भरलेला स्वाधार योजना अर्जाचा नमुना
१०वीची मार्कशीट
ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC)
बोनाफाईड प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र
बँक पासबुक झेरॉक्स
वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याचा शपथपत्र
निवासी दाखला
पालकांचं शपथपत्र
शाळा/कॉलेजकडून शिफारसपत्र

स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

या योजनेसाठी सध्या ऑनलाइन अर्जाची सुविधा नाही. अर्ज पूर्णतः ऑफलाइन असतो. अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

1. इथे क्लिक करून फॉर्म PDF डाऊनलोड करा.
2. फॉर्म प्रिंट करून त्यात सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
3. आवश्यक कागदपत्रं जोडून फॉर्म पूर्ण करा.
4. तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात फॉर्म जमा करा.
5. काही त्रुटी असल्यास सुधारणेची सूचना येईल, अन्यथा तुमचा अर्ज स्वीकार केला जाईल.

FAQ’s – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

प्र.1) स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

उत्तर: अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावा लागतो. अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाऊनलोड करून समाज कल्याण कार्यालयात तो सबमिट करावा लागतो.

प्र.2) या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

उत्तर: अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील महाराष्ट्रातील नियमित विद्यार्थी ज्यांना सरकारी वसतिगृहात प्रवेश नाही मिळाला, ते या योजनेसाठी पात्र आहेत.

प्र.3) किती रक्कम मिळते?

उत्तर: विद्यार्थ्याला एकूण ₹51000 पर्यंत मदत दिली जाते.

प्र.4) कधी अर्ज करायचा?

उत्तर: अर्जाची शेवटची तारीख अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी जाहीर केली जाते. त्यामुळे नेहमी अधिकृत पोर्टल तपासावे.

निष्कर्ष

शिक्षण हा आपल्या आयुष्याचा पाया असतो. जर कुटुंबाच्या गरीब परिस्थितीमुळे ते अडत असेल, तर अशा योजनांचा लाभ घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे. जर तुम्हाला शहरांमध्ये जाऊन शिक्षण जायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ नक्की घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मित्रांना आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.

Leave a Comment