PM किसान 20वा हप्ता 2025: जूनमध्ये खात्यात जमा होणार पुढचा हप्ता, मिळणार 4000 रुपये? जाणून घ्या संपूर्ण माहिती
PM किसान 20वा हप्ता: तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, शेती हे फक्त पोटापुरतं साधन नाही तर शेती ही आपल्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि भारतामध्ये जवळपास 60 ते 70 टक्के लोक हे शेती करतात. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खंबीर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. ही योजना म्हणजे खरं तर शेतकऱ्यांना दिलेलं एक महत्त्वाचं बळ आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6000 रुपये थेट बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात. आणि हे पैसे शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिले जातात प्रत्येकी हप्त्या मध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात.
फेब्रुवारी 2025 मध्ये 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता सर्व शेतकरी मित्रांचे लक्ष 20व्या हप्त्याकडे लागले आहे की पुढचा हप्ता कधी येणार आहे? हा हप्ता वेळेवर येणार की नाही, कधी येईल, आणि त्यासाठी काय तयारी ठेवावी लागेल – हे सगळं आपण आज समजावून सांगणार आहोत.
पी एम किसान चा 20वा हप्ता कधी येणार?
सरकारकडून प्रत्येक हप्ता 4 महिन्यांच्या अंतराने दिला जातो. त्यामुळे जेव्हा फेब्रुवारीमध्ये 19 वा हप्ता आला होता, त्यामुळे आपण अंदाज बांधला आहे की पुढचा हप्ता जून महिन्यात येईल. सध्या मिळालेल्या माहितीप्रमाणे, 20वा हप्ता जून 2025 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
सरकारकडून अजूनही हप्त्याची तारीख जाहीर झालेली नाही, पण नेहमीप्रमाणे पोर्टलवर यादी अपडेट होत असते, त्यामुळे आपण वेळोवेळी माहिती तपासणं गरजेचं आहे.
20व्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत?
सगळ्या शेतकऱ्यांना PM किसान चा हप्ता मिळतो अस नाही. जे शेतकरी सरकारने ठेवलेल्या निकषांमध्ये बसतील त्या शेतकऱ्यांना हे पैसे दिले जातात. योजनेसाठी सरकारचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
e-KYC पूर्ण असणे अनिवार्य आहे. ज्यांनी KYC केलेलं नाही, त्यांचा हप्ता थांबवला जातो.
जमिन नोंदणी योग्य प्रमाणात असावी. मोठ्या शेतजमिनीधारकांना काही वेळा अपात्र ठरवले जाते.
बँक खातं DBT साठी सक्षम असणं आवश्यक आहे.
फॉर्मर ID आणि आधार क्रमांकाचा तपशील अचूक असावा.
ज्या शेतकऱ्यांनी चुकीची माहिती दिली किंवा वारंवार अपडेट केलं नाही, त्यांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात.
20वी हप्त्यासाठी नाव यादीत कसं तपासायचं?
1. https://pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा.
2. ‘Beneficiary List’ वर क्लिक करा.
3. राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव यांची माहिती भरा.
4. तुम्हालाच माहिती मिळेल की तुमचं नाव यादीत आहे की नाही.
जर तुमचं नाव यादीत नसेल, तर तातडीने CSC सेंटरला जाऊन तपशील अपडेट करा.
हप्त्याचं स्टेटस कसं पाहायचं?
1. पुन्हा एकदा pmkisan.gov.in या पोर्टलवर जा.
2. ‘Know Your Status’ किंवा ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
3. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाइल नंबर टाका.
4. OTP येईल, तो टाका.
5. तुमचा हप्ता आला की नाही, किती रुपये आलेत, ते सगळं स्क्रीनवर दिसेल.
अफवा आणि गैरसमज यांपासून सावध राहा
बऱ्याच लोकांमध्ये ही चर्चा सुरू आहे की “यंदा 4000 रुपये मिळणार”, “दोन हप्ते एकत्र येणार”, वगैरे. पण यावर विश्वास ठेवू नका. सरकारने अजून पर्यंत असं काहीही जाहीर केलेल नाही त्यामुळे या अफवांकडे लक्ष देऊ नका .
माझा अनुभव काय सांगतो?
मी स्वतः गेली 4 वर्षे ही योजना वापरत आहे. काहीवेळा हप्ता थोडा उशिरा येतो, पण पैसे जमा झाले की समाधान मिळतं. हे पैसे खतं, बियाणं, कीटकनाशकं यासाठी उपयोगी पडतात. एकदा KYC केलं नव्हतं, त्यामुळे हप्ता थांबला. त्या वेळी लक्षात आलं की जरी आपण शेतकरी असलो तरी आपल्यालाही डिजिटल गोष्टी शिकणं गरजेचं आहे.
शेवटी एक सांगणं
ही योजना सरकारने आपल्यासाठीच आणलेली आहे. त्याचा लाभ मिळवण्यासाठी कायदेशीर माहिती योग्य वेळेवर अपडेट ठेवणं, पोर्टलवर लक्ष ठेवणं, आणि चुकीच्या अफवांपासून दूर राहणं – हेच आपल्यासाठी फायदेशीर आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे,
तुमचं नाव यादीत आहे का?
KYC झालंय का?
हप्त्याचं स्टेटस तपासलंय का?
– या तीन गोष्टी विसरू नका.